Couple blown up; husband killed, wife critical : Devdarshan Adhure : देवदर्शनासाठी निघालेल्या पती – पत्नीवर बेराळा फाट्यावर काळाने घाला घातला. चिखली ते जालना मार्गावर एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने पती ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. २३ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजता ही दुर्घटना घडली.

चिखली-जालना मार्गावर बेराळा फाट्यावर एसटी बसची दुचाकीस धडक
चिखली : देवदर्शनासाठी निघालेल्या पती – पत्नीवर बेराळा फाट्यावर काळाने घाला घातला. चिखली ते जालना मार्गावर एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने पती ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. २३ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजता ही दुर्घटना घडली.
केळवद येथून जांभोऱ्याला देवदर्शनासाठी जाणाऱ्या पती पत्नी च्या दुचाकीस रस्ता ओलांडत असतांना जालण्याकडुन येणाऱ्या बस ने दिलेल्या जबर धडकेत दुचाकी वरील
तालुक्यातील केळवद येथील संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८) व पत्नी शीला गायकवाड (वय ५०) हे दाम्पत्य २३ फेब्रुवारीच्या सकाळी जांभोरा येथे दर्शनासाठी जात होते. बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडताना जालन्याकडून भरधाव वेगात आलेल्या एमएच-१४-एमएच-०८७२ क्रमांकाच्या संभाजीनगर ते हिंगणघाट या बसने दुचाकीला जबरदस्त धडक दिली. या धडकेत पती संजय गायकवाड जागीच ठार झाले, तर पत्नी शीला गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

