Death of an unidentified person : अनोळखी इसमाचा मृत्यू ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन.
बुलढाणा, : पोलीस स्टेशन, बुलढाणा शहर परिसरातील केळवद शिवार येथून एका अनोळखी इसमास उपचारासाठी सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले होते. या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ रोजी सुमारे ३५ वर्षे वयाचा एक अनोळखी इसम केळवद शिवार येथे आढळून आला. त्या इसमास १०८ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दि. २२ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. सदर इसमाजवळ कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे आढळून आलेली नसून त्याचे नातेवाईक अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
मृत इसमाचे वर्णन याप्रमाणे : रंग सावळा, वय अंदाजे ३५ वर्षे, उंची सुमारे ५ फूट ३ इंच, बांधा सडपातळ, इसमाच्या अंगावर लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे. अशा वर्णनाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीची ओळख पटल्यास त्वरित शासकीय रुग्णालय पोलीस चौकी, बुलढाणा येथे किंवा एएसआय वाणी मो.क्रं. ९८५०९२३१०१, नरेंद्र रोटे मो.क्रं. ९६२३२४३७३३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


