mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धनगर समाज आरक्षणाची धग बुलढाणा जिल्ह्यात : Dhangar community reservation issue in Buldhana district

शेअर करा :

Dhangar community reservation issue in Buldhana district : धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गजानन बोरकर यांनी २४ मार्चला सकाळी साडेनऊ वाजेपासून जानेफळ येथील मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

Dhangar community reservation issue in Buldhana district
जानेफळ येथील टॉवरवर सुरू असलेले आंदोलन

दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ गजानन बोरकर यांचे टॉवरवर चढून आंदोलन

आसिफ शाह 

मेहकर : धनगर समाजाची एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून आजपर्यंत केवळ आश्वासनेच मिळाली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे, यासाठी १६ मार्चपासून दीपक बोराडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मात्र शासन दखल घेत नसल्याचा आरोप समाज बांधवांनी करत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटले आहेत. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गजानन बोरकर यांनी २४ मार्चला सकाळी साडेनऊ वाजेपासून जानेफळ येथील मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनास पाठिंबा म्हणून समाजबांधव जानेफळकडे गर्दी करत आहेत.

 

प्रशासनाने घेतली धाव

गजानन बोरकर टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच जानेफळ ठाणेदार व मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके, अप्पर तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन खाली उतरण्याची विनंती केली.

 

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची जोपर्यंत दखल घेतली जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. 

गजानन बोरकर, आंदोलक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top