mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

Diesel went to save : डिझेल वाचवायला गेला अन् जीव गमवून बसला!

शेअर करा :

Diesel went to save : पोकलेनमधून डिझेल चोरीस जाते म्हणून चालक केबिनमध्ये झोपला. काही रुपयांचे इंधन वाचविण्यास गेलेला चालक मात्र आपला अनमोल जीव गमवून बसला.

बुलढाणा : पोकलेनमधून डिझेल चोरीस जाते म्हणून चालक केबिनमध्ये झोपला. काही रुपयांचे इंधन वाचविण्यास गेलेला चालक मात्र आपला अनमोल जीव गमवून बसला. नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पावर ही हृदयद्रावक घटना घडली.

जिगाव प्रकल्पावर कामाला असलेल्या पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू झाला. २४ जानेवारीला सकाळी ही घटना उघडकीस आली. मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील चंद्रेह येथील राकेशसिंह जमाहीरसिंह गोंड (वय २४) हा जिगाव धरणाच्या कामावर पोकलेन चालक म्हणून काम करीत होता. पोकलेनमधून डिझेल चोरीस जात असल्यामुळे राकेशसिंह रात्री पोकलेनच्या केबिनमध्ये झोपला होता. हे वाहन मातीच्या ढिगाऱ्यावर उभे होते. दरम्यान, बाजूने जाणाऱ्या वाहनामुळे मातीचा ढिगारा खचून उभे पोकलेन घसरून चालक राकेशसिंह दबला. गंभीर दुखापत होऊन तो ठार झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top