mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : Do not believe rumors regarding a petrol and diesel shortage.

शेअर करा :

Do not believe rumors regarding a petrol and diesel shortage. : पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

Do not believe rumors regarding a petrol and diesel shortage.

बुलढाणा :

बुलढाणा जिल्ह्यात सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याने पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तातडीने कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांमुळे घाबरून अनावश्यक साठेबाजी करण्याची गरज नाही. पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले मुख्य निर्बंध:

खुल्या कंटेनरमध्ये विक्रीवर बंदी: कोणत्याही पेट्रोल पंपावर प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा इतर अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इंधन फक्त वाहनांच्या टाकीतच भरले जाईल.

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य: रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्याच्या सूचना पंप चालकांना देण्यात आल्या आहेत

साठ्याची पारदर्शकता: प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोजचा उपलब्ध साठा आणि विक्रीची माहिती फलकावर स्पष्टपणे प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही देखरेख: सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय ठेवणे आणि विक्री नोंदी नियमित अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

Do not believe rumors regarding a petrol and diesel shortage.

कठोर कारवाईचा इशारा:

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा पंप चालकांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “अनावश्यक साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नका. प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा आणि सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखा.”

नागरिकांनी शांत राहून सामान्य दिनचर्या कायम ठेवावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top