Dr. Prashant Tangdes appeal to attend the National Health Fair : संतनगरीत २५ फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६ चे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी केले आहे.

शेगाव : संतनगरीत २५ फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६ चे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी केले आहे.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी उपचार सेवा, नेत्रतपासणी शिबिर, दिव्यांगांसाठी ADIP तपासणी व साहित्य वाटप, तसेच विविध आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम व शेतकऱ्यांसाठी कार्यशाळाही घेण्यात येत आहेत.

