mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलडाणा जिल्हात डॉ. प्रवीण तोगडिया यांचा दौरा.. धाड येथे होणार सत्कार : Dr. Pravin Togadia’s Visit to Buldhana District; Felicitation to be Held at Dhad.

शेअर करा :

Dr. Pravin Togadia’s Visit to Buldhana District; Felicitation to be Held at Dhad.. : बुलढाणा जिल्ह्यात प्रवीण तोगडिया यांचा दौरा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट

Dr. Pravin Togadia's Visit to Buldhana District; Felicitation to be Held at Dhad.


 अनिल कुटे प्रतिनिधी :

धाड  : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचा बुलढाणा जिल्हा दौरा रविवार, दि. 12 एप्रिल रोजी होणार असून त्यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले तोगडिया यांनी शिरपूर, चाळीसगाव , छत्रपती संभाजीनगर व जालना येथील सभा पूर्ण केल्यानंतर ते धाड येथे सकाळी 10.30 वाजता करडी चौकात दाखल होणार आहेत. येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर ते बुलढाण्याकडे रवाना होतील.

सकाळी 11 वाजता बुलढाणा शहरातील संगम चौक येथे कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांचे स्वागत होईल. यावेळी ते शिवनाथसिंग राजेंद्रसिंग राजपूत यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

यानंतर मोताळा येथे भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला असून शेंबा येथेही त्यांचे स्वागत होणार आहे. विविध ठिकाणी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून शेवटी खामगावकडे प्रस्थान करणार आहेत.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत मंत्री जीवनसिंग राजपूत यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top