mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धाडचे ज्येष्ठ वैद्यकीय व समाजसेवक डॉ. सय्यद बशीर यांचे निधन : Dr. Syed Bashir, a senior medical practitioner and social worker from Dhad, passes away.

शेअर करा :

Dr. Syed Bashir, a senior medical practitioner and social worker from Dhad, passes away. : धाडचे ज्येष्ठ वैद्यकीय व समाजसेवक डॉ. सय्यद बशीर यांचे निधन. परिसर शोकमग्न

Dr. Syed Bashir, a senior medical practitioner and social worker from Dhad, passes away.

धाड (प्रतिनिधी) –: धाड आणि परिसरासाठी अत्यंत दुःखद अशी बातमी आज सकाळी समोर आली. धाड येथील ख्यातनाम वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व डॉ. सय्यद बशीर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

डॉ. बशीर हे केवळ एक डॉक्टर नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने मानवतावादी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ समाजसेवेसाठी अर्पण केला. ग्रामीण रुग्णालय धाड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःचे क्लिनिक सुरू ठेवून गरजू रुग्णांची सेवा अखंडितपणे सुरू ठेवली.

त्यांच्या नम्र, दयाळू आणि प्रामाणिक स्वभावामुळे ते सर्व समाजघटकांमध्ये अत्यंत आदरणीय होते. धर्म, पंथ यापलीकडे जाऊन त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

डॉ. बशीर यांच्या जीवनातील सर्वात उल्लेखनीय कार्य म्हणजे त्यांनी दाखवलेले औदार्य. परिसरातील रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी स्वतःची सुमारे तीन एकर जमीन कोणताही मोबदला न घेता रुग्णालयासाठी दान केली. आज त्या ठिकाणी उभे असलेले रुग्णालय त्यांच्या समाजसेवेचे जिवंत प्रतीक आहे, जिथे दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.

Dr. Syed Bashir, a senior medical practitioner and social worker from Dhad, passes away.

सुमारे तीन एकर जमीन कोणताही मोबदला न घेता रुग्णालयासाठी दान केली धाड पंचक्रोशीतील लोक आपले नेहमीच ऋणी राहतील. 💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐

त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने धाड परिसराने एक महान, सेवाभावी आणि आदर्श व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

त्यांच्यावर आज, रविवारी गंज शहीदा कब्रस्तान, संभाजीनगर  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय व सामाजिक नेते तसेच त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top