Drunk driving bus : स्टेअरिंगवर दारूच्या नशेत बसून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून वाहन बस चालविणाऱ्या परतवाडा आगाराच्या मद्यपी चालकाविरुद्ध खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रवाशांचा जीव धोक्यात : चालकावर गुन्हा
खामगाव : स्टेअरिंगवर दारूच्या नशेत बसून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून वाहन बस चालविणाऱ्या परतवाडा आगाराच्या मद्यपी चालकाविरुद्ध खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
परतवाडा आगाराचा चालक प्रल्हाद मोतीराम खंडाते याने कर्तव्यावर असताना दारू ढोसली. तो दारू पिलेला असल्याचे प्रवाशांनी पाहिले. त्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणी वाहतूक नियंत्रक प्रशांत देशमाने यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. परतवाडा ते खामगाव या बसवर चालक असलेला खंडाते हा दारू प्यायलेला होता. नशेच्या अवस्थेतच तो बस चालवित असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता होती. खामगाव येथे आल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. मध्यरात्रीच आरोपी बसचालकाविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५ सह मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हे दाखल केले.

