mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मातंग समाजाचा खामगावात एल्गार; एसडीओ कार्यालयावर मोर्चा : Elgar of Matang community in Khamgaon

शेअर करा :

Elgar of Matang community in Khamgaon : खामगाव रेल्वे स्थानक परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी मातंग समाजबांधवांनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Elgar of Matang community in Khamgaon
खामगावात एसडीओ कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा
Elgar of Matang community in Khamgaon
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना समाजबांधव

अण्णाभाऊ साठे यांच्या सौंदर्यीकरणाची प्रमुख मागणी

बुलढाणा : खामगाव रेल्वे स्थानक परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी मातंग समाजबांधवांनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय निधीतून तातडीने सौंदर्यीकरण करावे, नगर परिषदेद्वारे उभारण्यात येणाऱ्या नवीन व्यापारी संकुलाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, पुतळ्याच्या जागेबाबतचे तांत्रिक प्रश्न मार्गी लावून ती जागा अधिकृतरीत्या सौंदर्यीकरणासाठी मोकळी करून द्यावी, या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याबाबत एसडीओंना निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top