Emotional farewell to the students of class 10th and 12th of DGI School : दहा व बारा वर्षे शाळेत शिक्षण घेत असताना अनेक संस्मरणीय गोष्टींच्या आठवणी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात साठविल्या. आता शाळेला अलविदा करण्याची वेळ आली. असंख्य चांगल्या गोष्टी शिकून, गुरुजनांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करण्यासाठी विद्यार्थी जडअंतकरणाने रवाना झाले. 

मुलांनी शाळेच्या गोड आठवणी नेल्या सोबत
धाड : दहा व बारा वर्षे शाळेत शिक्षण घेत असताना अनेक संस्मरणीय गोष्टींच्या आठवणी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात साठविल्या. आता शाळेला अलविदा करण्याची वेळ आली. असंख्य चांगल्या गोष्टी शिकून, गुरुजनांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करण्यासाठी विद्यार्थी जडअंतकरणाने रवाना झाले. प्रसंग होता दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा. म्हसला बुद्रुक येथील देविदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या निरोप सभारंभात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना गहिवरून आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संतोष कारले (सिल्लोड) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल घोरपडे यांनी भूषवले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, मेहनत, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात अनिल घोरपडे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे प्राचार्य अमोल घोरपडे, शिक्षक संदीप पालकर, नितीन केवट, भारत पालकर, राहुल रुद्राक्ष, सागर तायडे, विजय रोजेकर, ताले, पंडितकर, गणेश घोरपडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन योगेश पालकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व भावनिक वातावरणात पार पडला.

