mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

employees on strike : लाखो कर्मचारी संपावर

शेअर करा :

Millions of employees on strike : पाच दिवसांचा आठवडा आयबीए (इंडियन बॅंक असोसिएशन) द्वारे मान्य होऊनही शासनाने त्यावर अमलबजावणी केली नसल्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या रोषातूनच मंगळवार, २७ जानेवारीला देशभरातील आठ लाख कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले.

देशभरातील बॅंका बंद : पाच दिवसांच्या आठवड्यासाठी सरकारवर नाराजी

शरद माळोदे

बुलढाणा : पाच दिवसांचा आठवडा आयबीए (इंडियन बॅंक असोसिएशन) द्वारे मान्य होऊनही शासनाने त्यावर अमलबजावणी केली नसल्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या रोषातूनच मंगळवार, २७ जानेवारीला देशभरातील आठ लाख कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले आहेत. आज दिवसभर बॅंकांना टाळे लागल्याने अरबो-खरबोमधील व्यवहार ठप्प झाले. युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. आरबीआय, एलआयसी, जीआयसीमध्येही हा नियम पाळला जात आहे. परंतु बॅंकिंग क्षेत्राला यातून वगळण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पाच दिवसांचा आठवडा ही मागणी आयबीएद्वारे मान्य झाली. मात्र, दोन वर्षे लोटूनही शासनाने त्याची अमलबजावणी केली नाही. बॅंकांच्या संघटनांमार्फत शासनाकडे अर्ज, विनंत्या आणि सनदशीर मार्गाने ही मागणी रेटून धरण्यात आली. तरीदेखील पाच दिवसांच्या आठवड्याबाबत निर्णय झाला नाही. शासनाने आम्हाला आजच्या संपासाठी मजबूर केले, अशा प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान व्यक्त केल्या.

ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी

दिवसभर बॅंकांना टाळे लागलेले होते. याचा फटका ग्राहक, खातेदारांना बसला. आमच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरीदेखील ग्राहकांना त्रास होत असल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे संघटनेचे सचिव अविनाश बोचरे यांनी सांगितले.

… तर लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा

शनिवार तसेच रविवारच्या सुटीच्या दिवशीही ऑनलाइनसह विविध माध्यमातून कर्मचारी सुविधा देतात. अशा परिस्थितीतही मागणी मान्य होत नाही. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आजचा हा देशव्यापी संप आहे. तरीही मागणी मान्य न झाल्यास लढा अधिक तीव्र करू, असा इशारा एसबीआय स्टाफ युनियनचे अमरावती विभागीय सचिव अविनाश बोचरे यांनी दिला आहे. 

अपुरे मनुष्यबळ

सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशात २५ हजाराहून अधिक शाखा आहेत. त्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी आहे. कर्तव्याशिवाय त्यांना अधिक तास रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. याचाही पाच दिवसांचा आठवडा गरजेचा असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top