Even after corruption charges were proven, Gram Sevaks were immune to Panchayat officers : ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अमोल धोटे यांनी तक्रार केल्यानंतर चौकशीअंती ग्रामपंचायत अधिकारी दोषी ठरला. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. प्रशासनाचे अभय मिळत असल्याने कारवाई कधी होणार? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

डोणगाव : ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अमोल धोटे यांनी तक्रार केल्यानंतर चौकशीअंती ग्रामपंचायत अधिकारी दोषी ठरला. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. प्रशासनाचे अभय मिळत असल्याने कारवाई कधी होणार? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
डोणगाव ग्रामपंचायत प्रशासनाने दोन लिपिकांना दोषी धरत बडतर्फ केले. पण, ग्रामसेवकार कारवाई झाली नसल्याने ग्रामसेवक निवांत होऊन सुट्टीवर गेल्याने गावातील कामे खोळंबली आहेत. यावर जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समिती प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत म्हणून डोणगावला ओळखले जाते. यासोबतच नेहमीच विविध कारणांनी ग्रामपंचायत चर्चेत राहते.
सचिव सुटीवर, गाव कारभार वाऱ्यावर
येथील अमोल धोटे यांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन केल्या गेली होती. चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार ३० जानेवारी रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मेहकर गटविकास अधिकाऱ्यास पत्र दिले. चौकशी अहवालानुसार अहवालामध्ये गंभीर बाबी आढळून आल्या. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा परिषद सेवा १९६४ चे ३ नुसार कार्यवाही करून प्रपत्र एक ते चार बजावून तत्काळ खाते चौकशी प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर करा, असे आदेशित केल्यानंतर सुद्धा गेल्या २७ दिवसांमध्ये मेहकर मेहकर गटविकास अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही तर दुसरीकडे डोणगाव ग्रामपंचायत व ग्राम पंचायत अधिकारी व्ही.के. दांडगे यांनी १८ फेब्रुवारी रोजी भ्रष्टाचाराच्या व आणि अनियमिततेच्या आरोपाखाली बडतर्फ केले. चौकशी समितीच्या अहवालानुसार परस्पर खर्च करणे, अभिलेख्यास नोंदी नसणे व इतर बाबीमुळे २ लाख २७ हजार ३० रुपये अफरातफर दिसून येत आहे, ही रक्कम तत्काळ ग्राम निधी / शासन खाती जमा करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तत्काळ सादर असे पत्र रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यास दिले. मात्र माहिती घेतली असता हे पैसे भरले गेलेच नाही तर दुसरीकडे डोणगाव येथील दोन श्याम खोटे व प्रदीप परमाळे यांनी ८८ हजार ३५५ रुपये परस्पर खर्च केल्याप्रकरणी त्यांच्याकडून १६ फेब्रुवारी रोजी पैसे भरून घेण्यात आले व १६ फेब्रुवारी रोजी भ्रष्टाचार व अनिमितता प्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आले. ज्याला पाहता परिषद प्रशासनाने दखल घेऊन डोणगाव येथे विशेष असा अधिकारी नेमणूक करावा, त्यासोबतच भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अमोल धोटे यांनी केली आहे. शासनाने येत्या सात दिवसांमध्ये दोषीवर कारवाई केली नाही तर गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठा सत्याग्रह केला जाईल, असा देण्यात आला.

