Risod-Washim road was blocked : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा भरपाई मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा भरपाई मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अडोळी फाट्यावर ९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता रास्तारोको आंदोलन करत वाशिम–रिसोड मार्ग रोखला. परिणामी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनाची माहिती मिळताच जिल्ह्याचे आरिफ शाह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ वरिष्ठ स्तरावर मांडून पीकविम्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, सतीश विढोळे, श्याम मते, राहुल कावरखे, मनोहर सावके, विशाल पोळ, जैस्वाल, अमोल एकशिंगे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. पीकविमा भरपाई तातडीने देण्याची ठोस कार्यवाही न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

