mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डोणगाव अर्बन ते युगंधरचा वेगवान प्रवास : Fast travel from Dongaon Urban to Yugandhar

शेअर करा :

Fast travel from Dongaon Urban to Yugandhar : डोणगावचा युवा कार्यकर्ता ऋषांक चव्हाण हे नाव सध्या सहकार क्षेत्रात अग्रक्रमावर येत आहे. डोणगाव अर्बनचे लावलेले छोटेसे रोपटे आज चव्हाण यांच्या मेहनतीच्या फळाने वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. जनतेच्या विश्वासाच्या मोठ्या पिल्लरवर पतसंस्थेचा मजबूत पाया उभा राहिला आहे. आज तर अर्बन ते मल्टीस्टेट असा वेगवान पल्ला गाठण्यात यांना यश आले आहे. १ फेब्रुवारीला नाशिक येथे डोणगाव अर्बनसंचलित युगंधर मल्टीस्टेटचा शुभारंभ करण्यात आला. 


Fast travel from Dongaon Urban to Yugandhar

नाशिक येथे मल्टीस्टेट शाखेचे उद्घाटन

आसिफ शाह
मेहकर : डोणगावचा युवा कार्यकर्ता ऋषांक चव्हाण हे नाव सध्या सहकार क्षेत्रात अग्रक्रमावर येत आहे. डोणगाव अर्बनचे लावलेले छोटेसे रोपटे आज चव्हाण यांच्या मेहनतीच्या फळाने वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. जनतेच्या विश्वासाच्या मोठ्या पिल्लरवर पतसंस्थेचा मजबूत पाया उभा राहिला आहे. आज तर अर्बन ते मल्टीस्टेट असा वेगवान पल्ला गाठण्यात यांना यश आले आहे. १ फेब्रुवारीला नाशिक येथे डोणगाव अर्बनसंचलित युगंधर मल्टीस्टेटचा शुभारंभ करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे २०२० सालात डोणगाव अर्बन ही पतसंस्था सुरू करण्यात आली. या पतसंस्थेने ग्राहकांना सेवा आणि सुविधा काय असतात, याची प्रचिती आणून दिली. अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास बँकेवर निर्माण झाला. पतसंस्थेने बघता बघता वटवृक्ष म्हणून वाटचाल सुरू केली. २०२५ मध्ये मल्टीस्टेट म्हणून युगंधर सुरू झाली. ज्याची पहिली शाखा हे कृषी उद्योग म्हणून ख्याती असलेल्या नाशिक येथे सुरू झाली आहे. तर याच नाशिक जिल्ह्यात येत्या काही महिन्यांमध्ये युगंधरच्या चार शाखा सुरू होणार आहेत. वाशीम जिल्ह्यात केनवड येथे सुद्धा युगंधरची शाखा सुरू होणार आहे.
डोणगाव अर्बन या नावाने ऋषांक चव्हाण व त्यांच्या मित्रांनी एक रोपटे लावले. या युवकांनी नवनवीन संकल्पना आणि उपक्उरम राबवून जनतेला अधिकाधिक सेवा मिळवून दिल्या. ग्राहकाला पतसंस्थेच्या माध्यमातून कोणकोणत्या सोयी, सुविधा आपण देऊ शकतो, याची चाचपणी केली. त्या सुविधा ग्राहकांना दिल्या. तत्पर सेवा व सुविधामुळे ग्राहकांचा विश्वास संपादित करत डोणगाव अर्बन नावारूपास आली.
बारा हजार ग्राहकांचा विश्वास त्यांनी जिंकला. डोणगाव अर्बन मुख्य शाखा व डोणगाव अर्बन नवीन शाखासोबतच बेलगाव शाखा असा प्रवास सुरू असतानाच २०२५ मध्ये ऋषांक चव्हाण व त्यांचे समविचारी मित्रमंडळी यांच्या प्रयत्नाने युगंधर मल्टीस्टेटचा परवाना मिळाला. तो म्हणजे बँकिंग क्षेत्रातला मोठा वटवृक्ष होय. कृषी क्षेत्रातील अग्रणी असे शहर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, मणुका व डाळिंब या फळांची उपज आहे, तेथे युगंधर मल्टीस्टेट सुरू केली. बँकिंग सेवा आणि सुविधा देऊन सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिकता वाढवून व्यापारी व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला तानाजी बनकर, सतीश मोरे, टोनी बागुल, गिरीश वर्मा, प्रतीक आकडे, सुनील थोरात, शैलेश कलंत्री, दीक्षाताई आकडे, राज गांगुर्डे, सुरेश चौहान, विवेक ठाकरे, डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल धोटे, देवेंद्र आखाडे, अनिल ठोंबरे, शेख समीर, संदीप सुराणा, उमेश जैन, राहुल दिलीप बनकर, राहुल भाऊसाहेबदादा बनकर, योगेश ढोमेसे, सुनील धाडीवाल, संदीप कोचर, पंकज सुराणा, शुभम मोरे, मो. नवाज यांच्यासह कर्मचारी वृंद व स्थानिक संचालक मंडळ उपस्थित होते.


Fast travel from Dongaon Urban to Yugandhar 
Fast travel from Dongaon Urban to Yugandhar

कोल्ड स्टोरेजची निर्मिती  
जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांना चांगली सेवा व सुविधा मिळावी, यासाठी नाशिक जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज युगंधरच्या वतीने सुरू करण्यात येणार असल्याचे ऋषांक चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. 

 

जिल्ह्यात चार शाखा सुरू होणार 
नाशिक जिल्ह्यातील घोटी, दिंडोरी, इगतपुरी, कसारा येथे चार युगंधरच्या मल्टीस्टेट शाखा स्थापन करणार असल्याचेही ऋषांक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top