mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रस्ता दुरुस्तीसह नाल्यांच्या बांधकामासाठी आ. श्वताताई महालेंना साकडे : For road repairs and construction of drains, A. Shwetatai Mahale has been given a grant.

शेअर करा :
For road repairs and construction of drains, A. Shwetatai Mahale has been given a grant.

धाडवासीयांतर्फे निवेदन सादर

धाड : छत्रपती शिवाजी महाराज चौकातून धामणगाव रोडवर पुलापर्यंत रोडची दुरुस्ती व  नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आमदार श्वेताताई महाले यांच्याकडे करण्यात आली आहे. 

यासंदर्भात धाड येथील नागरिक तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार महाले यांना निवेदन सादर केले. तर आमदारांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिखली उपविभागीय अभियंत्यांना हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. रस्ता बांधकामामुळे गावातील व लगतचे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सांडपाणी जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, जेणेकरून या भागातील व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. पावसाळ्यात गावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून येते व ते रोडवरून वाहत राहते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो, ही बाबही आमदार श्वेताताई यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

निवेदन देताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंग येंडोले, देवीदास जाधव, सहकार तालुकाध्यक्ष बबलू वाघूर्डे, धाड शहराध्यक्ष अनिल कुटे, दीपक देवकर, समाधान परसे, टीका खान, सागर वाघ, शुभम पंडित, मो. अतिक मो. सईद, संतोष खांडवे, दिगंबर नाना जाधव तसेच व्यापारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top