mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मंगळसूत्रचोर महिलांची टोळी पकडली : Gang of women stealing mangalsutra caught

शेअर करा :

Gang of women stealing mangalsutra caught : देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात मंगळसूत्र चोर व पर्सचोर महिलांची टोळी पकडली.

Gang of women stealing mangalsutra caught

देऊळगाव राजा बसस्थानकावर कारवाई
बुलढाणा : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात मंगळसूत्र चोर व पर्सचोर महिलांची टोळी पकडली. तीन महिला सोलापूर आणि एक माजलगाव येथील रहिवासी आहेत. या आरोपींनी एका महिलेची प्रवासादरम्यान पोथ चोरली होती.
नंदिनी सुरी गड्डी (वय २२), पार्वती राकेश गड्डी (वय २०), कस्तुरी राम गड्डी (वय २०) तिघी रा. सोलापूर व लक्ष्मी व्यंकटेश मच्छा (वय २५) रा. माजलगाव अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
फेमिनाबी नूर मोहंमद ही महिला ४ फेब्रुवारी २०२६ ला प्रवास करीत असताना देऊळगाव राजा ते देऊळगाव महीदरम्यान दोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोथ चार अज्ञात महिलांनी पिशवीमधून चोरली होती. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला.
९ फेब्रुवारी रोजी आरोपी महिला देऊळगाव राजा बस स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा करण्यात आला. महिला येताच त्यांना अटक करण्यात आली.


पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.


पोहेकॉ दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, मनोज खरडे तसेच देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पीएसआय नितीन मिंड यांनी पर्सचोर महिलांचा पर्दाफाश केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top