mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चैत्र पौर्णिमेनिमित्त जय संतोषी माता मंदिरात भव्य महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रम : Grand Mahaprasad and Religious Programs at the Jai Santoshi Mata Temple on the Occasion of Chaitra Pournima

शेअर करा :

Grand Mahaprasad and Religious Programs at the Jai Santoshi Mata Temple on the Occasion of Chaitra Pournima : चैत्र पौर्णिमेनिमित्त जय संतोषी माता मंदिरात भव्य महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रम.

Grand Mahaprasad and Religious Programs at the Jai Santoshi Mata Temple on the Occasion of Chaitra Pournima

शिवणी आरमाळ (पेंडावर) येथे भाविकांसाठी विशेष आयोजन उपस्थितीचे आवाहन

अंढेरा : शिवणी आरमाळ (पेंडावर) येथील जय संतोषी माता मंदिर शिवणी आरमाळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा निमित्त भव्य महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Grand Mahaprasad and Religious Programs at the Jai Santoshi Mata Temple on the Occasion of Chaitra Pournima

दिनांक १ एप्रिल २०२६, बुधवार रोजी हा धार्मिक सोहळा पार पडणार असून, भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच दिवशी रात्री ८ ते १२ वाजेदरम्यान सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर मध्यरात्री १२ नंतर होमपूजेचा कार्यक्रम होईल. सकाळी ४ वाजता होमातून निघणाऱ्या भक्तांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत की, महाप्रसाद व होमासाठी येताना खंड (आंबट पदार्थ) सेवन करून तसेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येऊ नये, ही नम्र विनंती करण्यात आली आहे.

या पवित्र प्रसंगी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top