mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धाडमध्ये छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक : Grand procession of Chhatrapati Shivaji Maharaj in Dhad

शेअर करा :

Grand procession of Chhatrapati Shivaji Maharaj in Dhad : धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आज सकाळी छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्साहाने गजबजला.

Grand procession of Chhatrapati Shivaji Maharaj in Dhad

महिलांनी फेटे, पुरुषांनी भगवी टोपी – संपूर्ण धाड भगवेमय

 बबलू वाघुर्डे 

धाड :  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आज सकाळी छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्साहाने गजबजला  स्थानिक शिवप्रेमींनी आयोजित केलेल्या भव्य शिवजयंती मिरवणुकीने संपूर्ण परिसर भगवा आणि देशभक्तीच्या जयघोषाने न्हाऊन निघाला.
सकाळी मूर्तीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी  ५ वाजता मिरवणुकीला सुरवात करण्यात आली . मिरवणुकीचे स्वरूप अत्यंत दिमाखदार होते – ढोल-ताशांचा गजर, लाठी-काठी-तलवारबाजीचे प्रात्यक्षिक, पालखी सोहळा, भजनी मंडळी ,ऑपरेशन सिंदूर   चा भव्य देखावा,  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मिरवणुकीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता.
महिलांनी फेटे बांधले, तर पुरुषांनी भगवी टोपी घालून उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण मिरवणूक शिवरायांच्या पराक्रम, स्वराज्य आणि हिंदवी स्वातंत्र्याच्या जयघोषाने गुंजली. जय भवानी, जय शिवराय असे घोषवाक्य सतत ऐकू येत होते.

Grand procession of Chhatrapati Shivaji Maharaj in Dhad     Grand procession of Chhatrapati Shivaji Maharaj in Dhad

या भव्य मिरवणुकीतून धाडवासियांनी  दाखवून दिले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम आजही प्रत्येक शिवप्रेमीच्या रक्तात वाहतात. हा उत्सव केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर रयतेच्या राजाच्या आदर्शांचा जागर करणारा होता.

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top