mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

ज्ञानगंगा अभयारण्य मार्ग रात्री बंद : Gyanganga Sanctuary Route Closed at Night

शेअर करा :

Gyanganga Sanctuary Route Closed at Night : ज्ञानगंगा अभयारण्य मार्ग रात्री बंद  पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन.

Gyanganga Sanctuary Route Closed at Night

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन व जैववैविध्य स्थळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणारा खामगांव–बोथा–बुलढाणा राज्य मार्ग क्र. 24 हा दररोज रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

वन्यजीव संवर्धन व वन संरक्षणाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. या मार्गावर खामगांव, बोथा, गोंधनखेड आणि वरवंड येथे एकूण चार वनउपज तपासणी नाके कार्यरत असून संबंधित वेळेत वनकर्मचारी वाहनांची तपासणी करून नोंदी घेतात. तथापि, काही वाहनचालकांकडून रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून तपासणी नाक्यांवरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा कृतींमुळे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत दंड व शिक्षेची तरतूद असून संबंधितांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस या परिसरात वाघ, बिबट्या आणि अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे वाहनांमुळे अपघात होण्याची तसेच वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांनी रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेत या मार्गावर प्रवास टाळावा आणि खामगांव–उंद्री–वरवंड–बुलढाणा या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top