He closed his eyes forever while sleeping under the tree : आंब्याच्या झाडाखाली झोपलेल्या मजुराचा निद्रिस्त अवस्थेतच मृत्यू झाला.

नारखेड शिवारात मजुराचा आकस्मिक मृत्यू
नांदुरा : आंब्याच्या झाडाखाली झोपलेल्या मजुराचा निद्रिस्त अवस्थेतच मृत्यू झाला. नारखेड येथे २ एप्रिलला ही घटना घडली.
जळगाव जामोद तालुक्यातील उमापूरचा रहिवासी जगन्नाथ लांबा बावस्कार ( वय ३५) हा मजुरीचे काम करीत होता. विजय चतरसिंग डाबेराव (रा. नारखेड) यांच्या काकाच्या शेतात १ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेदरम्यान आंब्याच्या झाडाखाली झोपला होता. त्याला २ एप्रिलला सकाळी त्याला उठविण्यासाठी गेले असता त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. अतिमद्य प्राशनाने त्याचा मृत्यू झाला असावा, अशा आशयाची फिर्याद पोलिसांत देण्यात आली. नांदुरा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ कलमाखाली मर्ग दाखल केला. पुढील तपास अंमलदार ससाने करीत आहेत.


