He went to the funeral, but unfortunately he had to be cremated himself : नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या तरुणावरच नातेवाइकांना अंत्यसंस्कार करावे लागल्याची दुर्दैवी घटना चिखली ते मेहकर महामार्गावर अंबाशी फाट्यावर रविवारी दुपारी दीड वाजता घडली.


बुलढाणा : नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या तहरुणावरच नातेवाइकांना अंत्यसंस्कार करावे लागल्याची दुर्दैवी घटना चिखली ते मेहकर महामार्गावर अंबाशी फाट्यावर रविवार,२२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली.
राम सुरेश राठोड (वय २७) असे मृत युवकाचे नाव असून, तो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात येणाऱ्या सावळदबारा देव्हारी येथील रहिवासी होता. चिखली ते मेहकर महामार्गाने जात असताना अंबाशी फाट्यावर एमएच-२०- एचएम -१३२९ या दुचाकीला एमएच-३७-जी-४८३७ क्रमाकांच्या इंडीका व्हीस्टाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. राम हा देव्हारी येथून मांडवा येथे अंत्यसंस्काराला निघाला होता. मात्र, मध्येच अपघात झाला.

