mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

Hunger strike against : शेतकरी उत्पादक कंपनीविरुद्ध उपोषण

शेअर करा :

Hunger strike against : शेतकरी उत्पादक कंपनीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता ग्रामपंचायतीने कंपनीला दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी जांभोरा येथील ग्रामस्थांनी २१ जानेवारीपासून देऊळगाव राजा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले आहे.

Hunger strike against :

बुलढाणा : शेतकरी उत्पादक कंपनीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता ग्रामपंचायतीने कंपनीला दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी जांभोरा येथील ग्रामस्थांनी २१ जानेवारीपासून देऊळगाव राजा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील जांभोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत गट नंबर ५६ मध्ये लता जगन बारवकर यांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत विदर्भ संस्कृती ॲग्रो प्रोड्यूसर ही कंपनी चालविण्यासाठी नाहरकत प्रमाण देण्यात आले होते. मात्र सदर नाहरकत प्रमाणपत्र देताना ग्रामस्थांना विचारात घेतले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. प्रमाणपत्र देऊ नये, यासाठी भीमाबाई कंकाळ, सिंधुबाई सुखदाने, जिजाबाई मुंडे, साहेबराव खडूळ, दलित कंकाळ यांनी उपोषण सुरू केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top