mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अजितदादांच्या अस्थिंचे खडकपूर्णात विसर्जन : Immersion of Ajitdadas bones in Khadakpurna

शेअर करा :

Immersion of Ajitdadas bones in Khadakpurna : बुलढाणा, चिखली येथे दर्शन झाल्यानंतर अस्थिरथ देऊळगाव मही येथील संत चोखा सागर (खडकपूर्णा धरण) वर पोहोचला. यावेळी विधिवत आणि भावुक वातावरणात अजितदादा यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

Immersion of Ajitdadas bones in Khadakpurna

बुलढाणा : जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान अजित पवार यांच्या अस्थी दर्शनासाठी फिरविण्यात आल्या. बुलढाणा, चिखली येथे दर्शन झाल्यानंतर अस्थिरथ देऊळगाव मही येथील संत चोखा सागर (खडकपूर्णा धरण) वर पोहोचला. या ठिकाणी धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या वातावरणात अस्थि विसर्जन झाले.
विसर्जनावेळी संपूर्ण वातावरण शांत, भावनिक आणि श्रद्धेने भारलेले होते. उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या मनात अजितदादांसोबतचे जुने प्रसंग, संघर्ष आणि सामाजिक कार्याच्या आठवणी दाटून आल्या. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आदरभाव होता.
याप्रसंगी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह आमदार मनोज कायंदे, माजी आमदार दिलीप सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, नरेश शेळके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, देऊळगाव राजा बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, माजी सभापती रियाजखॉं पठाण, राष्ट्रवादीचे नेते डॉ. रामप्रसाद शेळके यांच्यासह उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितदादांचे कार्य हे केवळ राजकीय मर्यादेत न राहता सामाजिक बांधिलकीशी जोडलेले होते. सामान्य माणसाच्या प्रश्नांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात दादांनी जपलेला राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचा सामाजिक समतेचा, मानवतेचा आणि परिवर्तनाचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Immersion of Ajitdadas bones in Khadakpurna

जेथे भूमिपूजन तेथेच वाहिल्या अस्थी
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते खडकपूर्णा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. अजित पवार हे जलसंपदा मंत्री असताना डाव्या कालव्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्याच प्रकल्पात दादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याही अस्थी येथेच वाहण्यात आल्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top