Increase in the remuneration of female attendants : अर्धवेळ स्त्री परिचरांच्या मानधनात तीन हजारांची वाढ करण्यात आली आहे.

सीटूच्या दीर्घ लढ्याला यश
बुलढाणा : अर्धवेळ स्त्री परिचरांच्या मानधनात तीन हजारांची वाढ करण्यात आली आहे. यासाठी सीटू संघटनेने केलेल्या लढ्याला यश आले आहे.
अर्धवेळ स्त्री परिचारिका या गेल्या काही दशकांपासून अर्धवेळ समजल्या जात असल्या तरी संपूर्ण दिवसभर आठ तास जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागात ग्रामीण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर अत्यल्प ३ हजार रुपये मासिक मानधनावर काम करतात. सेवेत कायम करून घ्यावे, किमान वेतन, पेन्शन, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आणि सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून सीटूच्या नेतृत्वात त्यांचा संघर्ष सुरू आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान परिचरांनी तीन महिन्यांचा दीर्घकाळ संप केला. सरकारने मानधन वाढ करतो म्हणून केवळ आश्वासन देऊन संप मागे घ्यायला प्रवृत्त केले. परंतु फेब्रुवारी २०२६ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी सीटूच्या नेतृत्वात राजूरा – लोणी अकोले असा पायी लॉंगमार्च काढून सरकारला मंत्रालयात संघटनेसोबत बैठक घेण्यास भाग पाडले. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे अर्धवेळ स्त्री परिचारिकांच्या मानधनात तीन हजार रुपयांची वाढ करण्याचे जाहीर केले. या तीन हजारांच्या मानधनवाढीचा शासन निर्णय १७ मार्च २०२६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचे सीटूच्या वतीने स्वागत करण्यात आले. लढ्याचा मोठा विजय आहे. या विजयामुळे गेल्या काही दशकांपासून अर्धवेळ स्त्री परिचारिका म्हणून काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, पेन्शन ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आणि सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी सीटूचा लढा हा कायम राहील, असे सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, महासचिव एम.एच. शेख तसेच सीटूचे राज्य सहसचिव तथा बुलडाणा जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, अर्धवेळ स्त्री परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगला मेश्राम, कुशीवर्ता मगर, छाया खंडारे, शारदा खंडेराव यांनी सां
गितले.


