mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

Inferior quality khichdi : ‘डीएसओं’ना खायला आणली निकृष्ट खिचडी; युवा सेनेचा संताप : आठ तास ठिय्या

शेअर करा :

Inferior quality khichdi : निकृष्ट दर्जाचा तांदूळ, ज्वारी देऊन शिधापत्रिकाधारकांची प्रशासनाने थट्टा चालविल्याचा आरोप करीत युवा सेना व विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना खायला निकृष्ट तांदळाची खिचडी अणून आंदोलन सुरू केले.

Inferior quality khichdi
बुलढाणा : निकृष्ट दर्जाचा तांदूळ, ज्वारी देऊन शिधापत्रिकाधारकांची प्रशासनाने थट्टा चालविल्याचा आरोप करीत युवा सेना व विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना खायला निकृष्ट तांदळाची खिचडी अणून आंदोलन सुरू केले. ५ जानेवारीला दुपारी एक वाजेपासून सुरू केलेले आंदोलन सायंकाळपर्यंत आठ तास चालले.
चिखली तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पुरवठा विभागामार्फत निकृष्ट धान्याचा पुरवठा होत आहे. कीड लागलेले, उंदरांच्या लेंड्यांनी भरलेले ज्वारी-तांदूळ दिले जात असल्याचा आरोप करीत युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओम गायकवाड यांच्या नेतृत्वात मंडपगावचे सरपंच सचिन कदम व सहकाऱ्यांनी ५ जानेवारीला जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय गाठले. सोबत निकृष्ट तांदळाची खिचडी शिजवून आणली. तसेच भाकर-ठेचा आणून ठिय्या आंदोलन सुरू केले. ‘आम्ही खातो, तुम्हीपण खा’ म्हणत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान अधिकारी जयश्री ठाकरे निघून गेल्या. काहीऐक ऐकायचे नाही, अशी आडमूठी भूमिका ठाकरे यांनी घेतल्याचा आरोप भुतेकर यांनी यावेळी केला. पोलिसांना बोलावून आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला. अखेर उशिरा आलेल्या डीएसओंनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top