mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, इनडोर स्टेडियम, जलतरण तलाव उभारणार : International standard synthetic track, indoor stadium, swimming pool to be constructed

शेअर करा :

आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, इनडोर स्टेडियम, जलतरण तलाव उभारणार : International standard synthetic track, indoor stadium, swimming pool to be constructed

International standard synthetic track, indoor stadium, swimming pool to be constructed : बुलढाणा शहराची क्रीडा क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून नावलौकिक वाढण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, इनडोर स्टेडियम व जलतरण तलाव उभारला जाईल, अशी ग्वाही आ. गायकवाड यांनी यावेळी दिली. 

International standard synthetic track, indoor stadium, swimming pool to be constructed

अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार : आ. संजय गायकवाड यांची ग्वाही

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ

बुलढाणा : वाढता ताण-तणाव, मोबाइल व समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे विविध खेळ व संस्कृती लोप पावत आहेत. अशावेळी  मातीशी नाळ जुळलेली राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला. बुलढाणा शहराची क्रीडा क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून नावलौकिक वाढण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक, इनडोर स्टेडियम व जलतरण तलाव उभारला जाईल, अशी ग्वाही आ. गायकवाड यांनी यावेळी दिली.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अधिकारी कर्मचारी यांच्या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ आज आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात होते. यावेळी मंचावर गुलाबराव खरात यांच्या सुविद्य पत्नी रिपिका खरात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त नवलकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयोजन समितीचे सदस्य सचिव आशिष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, सतीश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने, कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंडोगडे, सर्व पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व विविध खातेप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार संजय गायकवाड म्हणाले, प्रशासकीय कामकाज करताना निर्माण होणारे ताणतणाव लक्षात घेता त्यामधून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाला विविध छंद जोपासणे आवश्यक आहे. सुदृढ शरीर व सशक्त मनासाठी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा तसेच क्रीडा क्षमतांचा विकास गरजेचा आहे. त्या दृष्टीने ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित होणाऱ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा निश्चितच उपयुक्त आहेत.
क्रीडा प्रकारातील विविध सामने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत होणारे विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या पंचांनी सुद्धा भानगडी न करता वस्तुनिष्ट मूल्यांकन करून यथोचित स्पर्धकांना न्याय द्यावा, असेही गायकवाड म्हणाले.

शिस्त, सभ्यतापूर्वक स्पर्धा यशस्वी करा : सीईओ खरात 

अध्यक्षीय मार्गदर्शनात गुलाबराव खरात यांनी खेळाडूंना देण्यात आलेल्या शपथेचा संदर्भ देऊन शिस्त व सभ्यतापूर्वक हा तीन दिवसीय स्पर्धांचा कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे स्वत: क्रीडापटू असल्याने व त्यांनी ठोसपणे क्रीडा विकासासाठी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे घोषित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रास्ताविकपर भाषणात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयोजन समितीचे सचिव आशिष पवार यांनी ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या होत असलेल्या आयोजनाबाबतची पार्श्वभूमी विशद केली.

International standard synthetic track, indoor stadium, swimming pool to be constructed

अजितदादांना आदरांजली
समारंभाच्या सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी महाराष्ट्र गीत गायन केले.

क्रीडा ध्वजारोहण, ज्योत प्रज्वलन
आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात व मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण, क्रीडा ज्योत प्रज्वलन करून सर्व खेळाडूंना शपथ देण्यात आली. यावेळी संगीतमय वातावरणात व आकाशात विविध रंगी फुगे सोडून स्पर्धांचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top