mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

Kailas Zholge : कैलास झोळगे ठरले मराठवाड्यातील पहिले समुद्रवीर

शेअर करा :

Kailas Zholge : गुजरातमधील पोरबंदर येथे रविवार, 4 जानेवारी रोजी पार पडलेल्या एसआरएसएससी स्विमिंग ऑल इंडिया समुद्रवीर सागरी जलतरण स्पर्धेत जालना येथील राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक व जलतरणपटू कैलास झोळगे यांनी 15 किलोमीटरचे समुद्राचे अंतर सलग पोहत पार केले.

Kailas Zholge

जालना : गुजरातमधील पोरबंदर येथे रविवार, 4 जानेवारी रोजी पार पडलेल्या एसआरएसएससी स्विमिंग ऑल इंडिया समुद्रवीर सागरी जलतरण स्पर्धेत जालना येथील राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक व जलतरणपटू कैलास झोळगे यांनी 15 किलोमीटरचे समुद्राचे अंतर सलग पोहत पार केले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून विजेते पदक व चषक मिळविले. या कामगिरीमुळे ते त्यांच्या वयोमनाचे मराठवाड्यातील पहिले समुद्रवीर ठरले आहेत.
या राष्ट्रीय सागरीय जलतरण स्पर्धेत विविध वयोगटातील देशातील 1400 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. देशात सर्वत्र थंडीची लाट असताना कैलाश या अष्टपैलू जलविराने प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत, जिद्द, शिस्त व चिकाटीच्या जोरावर जालना सिव्हिल क्लबमधील 25 मीटर स्विमिंग पूलमध्ये सकाळी पाण्याचे तापमान 9 ते 10 डिग्री सेल्सिअस असतानासुद्धा दररोज तीन ते चार तास सराव करून आपली शारीरिक क्षमता पणाला लावली.
कैलास झोळगे राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक जलतरणपटू असून, जालन्याचे पहिले लोहपुरुष हाफ आयर्न मॅन पाठोपाठ आता मराठवाड्याचे पहिले समुद्रवीर म्हणून त्यांनी आपली ओळख सिद्ध केली. या अद्वितीय यशाबद्दल विविध खेळ संघटना, सिव्हिल क्लब व्यवस्थापन सदस्य, मित्र परिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे.

∆ खडतर समुद्री अंतर

जगातील अत्यंत खडतर समुद्र अंतरापैकी असे पोरबंदर समुद्रातील खारे पाणी, जलचर प्राणी, विविध सागरी जीवसृष्टी असलेल्या महासागरातील प्रचंड लाटा, हवा, बदलणारे तापमान व वेळोवेळी बदलणारी भरती ओहोटीची अनिमितता या खडतर परिस्थितीवर मात करत कैलास झोळगे यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
००००००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top