Khamgaon hoisted black flags : सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी प्रशासन कारवाई करीत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर काळे झेंडे फडकावून निषेध नोंदवला.

खामगाव : सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी प्रशासन कारवाई करीत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर काळे झेंडे फडकावून निषेध नोंदवला.
निधीचा गैरवापर, निकृष्ट कामे व अनियमिततेबाबत पुराव्यांनिशी तक्रारी करूनही कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत विकासकामांच्या खर्चाबाबत जाब विचारला असता त्याची उत्तरे ग्रामपंचायत प्रशासनाला देता आली नाही, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.
नदीपात्रात उभारण्यात आलेल्या अवैध संरक्षक भिंतीमुळे दलित वस्ती तसेच ऐतिहासिक महादेव मंदिराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भिंत पाडून सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रशासनाला काळे झेंडे दाखविण्यात आले.

