mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लाखो विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर करणार कवायत संचलन

शेअर करा :
Lakhs of students will perform patriotic songs and march in a parade

प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाला अनोखी सलामी
उपक्रमात २४६७ शाळांचा सहभाग

शरद माळोदे

बुलढाणा : शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, शिस्त, आरोग्य जागृती आणि देशभक्तीचा संस्कार रुजवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २६ जानेवारी रोजी या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायतीचे संचलन करण्याचा उपक्रम राबवण्याबाबतचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या २४६६ शाळांमधील पाच लाख विद्यार्थी प्रजासत्ताकदिनी कवायत आणि संचलन करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये देशभक्तीपर गीतावर आधारित सामूहिक कवायत संचलन होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचे कवायत संचलन केले होते. त्याच धर्तीवर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुन्हा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्र प्रथम ही भावना रुजावी आणि त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक शाळेत सदर कवायत होणार असून तालुक्याच्या ठिकाणी एक तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना संबंधित गावातील व शाळेतील सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शालेय भौतिक सुविधा विकसन समिती व गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक व लोकप्रतिनिधींनी उपस्थिती राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मैदाने सजणार
तालुकास्तरीय कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मैदानावर सजावट करण्यात येणार आहे. जिल्ह्याचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदान बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

देशप्रेम, राष्ट्रीय ऐक्याची भावना

विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढीस लागावे, राष्ट्र प्रथम ही भावना निर्माण व्हावी, शालेय शिस्त, आरोग्य, राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागावी म्हणून हा कार्यक्रम अत्यंत न भूतो न भविष्यती अशा प्रकारे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी ग्रामस्थांनी शिक्षण प्रेमी नागरिक व लोकप्रतिनिधींनी उपस्थिती राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top