Mahesh’s last visit to the saint : संत गजानन महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दिंडीतून परतत असताना ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. शेगाव येथे ही घटना घडली. त्याचे संतदर्शन अखेरचे ठरले. या घटनेने विठ्ठलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दु:ख अनावर झाल्याने गावात कोणत्याच घरी चूल पेटली नाही.

दिंडीतून परतताना मृत्यू; पेटली नाही चूल
मेहकर : संत गजानन महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दिंडीतून परतत असताना ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. शेगाव येथे ही घटना घडली. त्याचे संतदर्शन अखेरचे ठरले. या घटनेने विठ्ठलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दु:ख अनावर झाल्याने गावात कोणत्याच घरी चूल पेटली नाही.
मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील महेश गजानन व्यवहारे (वय २५) हा एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या फोर्समध्ये (एमएसएफ) कार्यरत होता. सुटीवर आल्यानंतर गावातून २३ जानेवारीला शेगावला संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेलेल्या दिंडीत तो सहभागी झाला होता. ही पायी दिंडी २७ जानेवारीला शेगाव येथे पोहोचली. संत गजानन महाराजांचे दर्शन झाल्यानंतर ७० तर ८० भाविक ट्रॅक्टरने परत निघाले होते. आनंद सागर परिसरात सायंकाळी धावत्या ट्रॅक्टरवरून दुसऱ्या ट्रॅक्टरवर चढत असताना पाय घसरून तो पडला. चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू. या घटनेची माहिती समजताच गावात शोककळा पसरली आहे.

