mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धाडमध्ये हप्तेखोरांकडून मेडिकलवाल्यास मारहाण : Medical worker beaten up by loan sharks during raid

शेअर करा :

Medical worker beaten up by loan sharks during raid : महिन्याला हप्ता दे नाहीतर धंदा करू देणार नाही, अशा धमक्या देत चार जणांनी दुधा येथील मेडिकल संचालकास मारहाण केली.

https://mahadesha.com/medical-worker-beaten-up-by-loan-sharks-during-raid/

चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
धाड : महिन्याला हप्ता दे नाहीतर धंदा करू देणार नाही, अशा धमक्या देत चार जणांनी दुधा येथील मेडिकल संचालकास मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास दुधा ते धाड मार्गावर कापून टाकू, कुणाला पत्ताही लागू देणार नाही, अशा धमक्या दिल्या. ६ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास धाड येथे ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी गावातीलच चार जणांविरुद्ध विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पवन राजेंद्र सोनुने (वय ३०)  असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. दुधा येथील रहिवासी असलेले सोनुने यांचे धाड येथे जनावरांच्या औषधीचे मेडिकल आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात होते. यावेळी आरोपी अक्षय जीवनलाल बिलंगे (वय २३), रोशन गणेश शिंदे (वय २२), राहुल विजय दळवी (वय २४) व एका अनोळखी तरुणाने पवन सोनुने यांना जगदंबा स्वीट मार्ट बिकानेरसमोर अडविले.
आरोपी अक्षय बिलंगे याने अश्लील शिवीगाळ करून  ‘तुला गावात राहायचे असेल आणि धंदा करायचा असेल, तर आम्हाला महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली. नाही तर तुला गावात धंदा करू देणार नाही, अशा धमक्या देत आरोपींनी पवन यांना हातातील कड्याने डाव्या फासळीवर, तोंडावर व ओठावर  मारहाण करून जखमी केले.

पोलीस स्टेशन बाहेरही धमकावले

घटनेनंतर पवन सोनुने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना आरोपींनी त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर गाठले. रिपोर्ट दिल्यास तुला दुधा ते धाड रस्त्यावर  कापून टाकू. कोणालाही काही माहिती होणार नाही, अशा धमक्या दिल्या.

श्रीकृष्ण चव्हाण यांच्याकडे तपास

दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध बीएएनएस कलम ११८ (१), २९६, ११५, ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण चव्हाण करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top