MLA Sanjubhau Gaikwad The Pillar of Support for Party Workers : कार्यकर्त्यांचा आधारवड संजुभाऊ गायकवाड निष्ठा, कार्य आणि नेतृत्वाचा दमदार प्रत्यय.

बुलढाणा :
मतदारसंघात आमदार संजूभाऊ गायकवाड हे नाव केवळ राजकीय पदापुरते मर्यादित नसून हजारो कार्यकर्त्यांच्या विश्वासाचे, आधाराचे आणि नात्याचे प्रतीक बनले आहे. राजकारणात नेते अनेक असतात, पण कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्य मानून त्याच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा राहणारा नेता दुर्मिळ असतो. संजूभाऊ गायकवाड यांनी आपल्या कार्यपद्धतीतून हेच दाखवून दिले आहे.
“कार्यकर्ता स्वयंपूर्ण, तरच पक्ष खंबीर” या विचारावर भाऊंनी सातत्याने काम केले आहे. केवळ भाषणांमध्ये आश्वासने देण्याऐवजी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांना उद्योग-व्यवसायासाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत केली. अनेक कार्यकर्ते जे पूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत होते, ते आज स्वावलंबी बनले आहेत. काही जणांनी स्वतःचे व्यवसाय उभे केले, तर काही जण आज चारचाकी वाहनांमधून फिरताना दिसतात. ही प्रगती केवळ वैयक्तिक नसून पक्षाच्या बळकटीसाठीही महत्त्वाची ठरली आहे.
संजूभाऊच्या कार्यशैलीतील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे त्यांनी जपलेले मानवी नाते. कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील कोणताही प्रसंग—आनंदाचा असो वा दुःखाचा—भाऊ स्वतः पुढाकार घेतात. कार्यकर्त्यांच्या मुलींची लग्ने त्यांनी स्वतःच्या घरचे समजून केली, कन्यादानापासून ते संपूर्ण खर्च उचलण्यापर्यंत जबाबदारी घेतली. तसेच दुर्दैवी प्रसंगी मृत्यू झाल्यास इतर विधींमध्येही त्यांनी आर्थिक व मानसिक आधार देत कार्यकर्त्यांना कधीही एकटे पडू दिले नाही. “अवघा मतदारसंघ हा माझा परिवार आहे” ही त्यांची भूमिका केवळ शब्दांपुरती न राहता कृतीतून दिसून येते.
अलीकडेच एका पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना भाऊंनी स्पष्टपणे सांगितले होते की, “कार्यकर्ता हा माझा जीव की प्राण आहे. कार्यकर्ते मोठे झाले, तरच आम्ही नेते मोठे होतो.” या वक्तव्यातून त्यांच्या नेतृत्वाची खरी दिशा स्पष्ट होते. मात्र, काही संकुचित मानसिकतेच्या लोकांनी या विधानाचा विपर्यास करून त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर यांनी या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ज्यांनी कार्यकर्त्यांसाठी आयुष्य वेचले, त्या नेत्याची बदनामी आम्ही कदापि सहन करणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, संजयभाऊ गायकवाड हे कार्यकर्त्यांचे ‘जीव की प्राण’ असून संपूर्ण संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
कार्यकर्त्यांच्या हितासाठी सातत्याने झटणारा, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आणि प्रत्येक प्रसंगी कुटुंबाप्रमाणे साथ देणारा नेता म्हणून आमदार संजूभाऊ गायकवाड यांची ओळख अधिक ठळक होत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे मतदारसंघात एक वेगळी राजकीय संस्कृती निर्माण झाली आहे, जिथे नातेसंबंध, विश्वास आणि सहकार्य यांना प्राधान्य दिले जाते.

आजही हजारो कार्यकर्ते “आमदार संजूभाऊ गायकवाड आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या घोषणेसह त्यांच्या पाठीशी उभे आहेत. येणाऱ्या काळातही हे नेतृत्व अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.


