mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बारा वर्षांच्या मुलीवर लादले मातृत्व : Motherhood imposed on a twelve-year-old girl

शेअर करा :

Motherhood imposed on a twelve-year-old girl : अवघे १२ वर्षे ४ महिने वय असलेल्या एका निरागस बालिकेचा वासनांध तरुणाने फायदा घेत तिच्यावर मातृत्व लादले. ही संतापजनक घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.

२२ वर्षीय तरुणाच्या कृत्याने संताप :  पोटात दुखू लागल्याने घटनेचे बिंग फुटले
चिखली : अवघे १२ वर्षे ४ महिने वय असलेल्या एका निरागस बालिकेचा वासनांध तरुणाने फायदा घेत तिच्यावर मातृत्व लादले. ही संतापजनक घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. पोटात दुखू लागल्याने घटनेचे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय आरोपीस अटक केली आहे.
सागर शेषराव सुरडकर (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी चिखली तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील रहिवासी आहे. तो एका गावातील ११ वर्षे चार महिने वयाच्या मुलीच्या घरी एकटी असताना गेला होता. त्याने १५ जून २०२५ ला तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. नंतरच्या काळात ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत त्याने तिचे लैंगिक शोषण केले. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आरोपी तेथे जायचा.

पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले. प्रकृती बिघडल्याने मुलीच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचे धक्कादायक निदान समोर आले. ही माहिती ऐकून मुलीच्या आईला मोठा धक्का बसला. तपासणीनंतर हे प्रकरण उजेडात आल्याने महिलेने चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
पोलिसांनी आरोपी सागर सुरडकरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ६४ (२)(एफ), ६४ (२) (एच), ६४ (२) (आय), ६४ (२), ६५(२) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) २०१२ च्या कलम ६, १०, १२ नुसार गुन्हे दाखल केले.  
आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे या करीत आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top