mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सख्ख्या भावाची हत्या : Murder of a close brother

शेअर करा :

Murder of a close brother : सख्ख्या भावाने खामगावातील गुन्हेगाराच्या मदतीने भावाचा निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह लाकडांवर जाळला. तसेच अस्थी आणि राख नदीत फेकून दिली.

Murder of a close brother
Murder of a close brother
मृतक : चेतन

लाकडे पेटवून मृतदेह जाळला; राखही केली नष्ट
खामगाव : सख्ख्या भावाने खामगावातील गुन्हेगाराच्या मदतीने भावाचा निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह लाकडांवर जाळला. तसेच अस्थी आणि राख नदीत फेकून दिली. ही खळबळजनक घटना खामगाव तालुक्यातील राहुड येथे घडली.
मारेकरी रोशन संजय इंगळे (वय ३६) याने धाकट्या चेतन संजय इंगळे (वय ३५) याची हत्या केली. त्यासाठी खामगावच्या महाकाल चौकात राहणाऱ्या रवी देवीदास राऊत (वय ३६) याची मदत घेतली. २५ फेब्रुवारीपासून चेतन बेपत्ता झाला होता. तसेच गावातील चर्चेवरून पोलीस पाटलांनी चेतनचा खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पिंपळगाव राजाचे ठाणेदार भागवत मुळीक व सहकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. संशयावरून रोशनला ताब्यात घेण्यात आले. तसेच खामगावातून रवी राऊत यालाही अटक करण्यात आली. २५ फेब्रुवारीला दुपारी दीड वाजता स्वत:च्या शेतात आरोपींनी चेतन इंगळेला डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला.

पुरावा नष्ट करण्यासाठी लाकडे गोळा करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. नंतर त्याची राख व अस्थी नदीत फेकून दिल्या. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चेतनची हत्या का केली, याबाबत पोलीस आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top