mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाण्याच्या मेडिकल कॉलेजला अजित पवारांचे नाव द्या : Name the medical college in Buldhana after Ajit Pawar

शेअर करा :

Name the medical college in Buldhana after Ajit Pawar : बुलढाण्याच्या मेडिकल कॉलेजला अजित पवारांचे नाव द्या

Name the medical college in Buldhana after Ajit Pawar

बुलढाणा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसिन यांनी केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेत आमदार सना मलिक शेख यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन सादर केले आहे.
दुसरबीडचे सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसिन यांनी ही मागणी केल्यानंतर आमदार सना मलिक यांनी मंत्रालय स्तरावर हा विषय मांडला. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला चालना देणाऱ्या या महाविद्यालयास दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रस्तावाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे समजते. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top