mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

तीन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पुरस्कार : National awards to three health centers

शेअर करा :

National awards to three health centers : किन्होळा (ता. चिखली, गणेशपूर (ता. खामगाव) आणि जानेफळ (ता. मेहकर) या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्यूएएस) पुरस्कार प्राप्त झाला आहे.

National awards to three health centers

बुलढाणा : जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्तेच्या आधारावर राष्ट्रीय पातळीवर दखल झाली आहे. तीन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. किन्होळा (ता. चिखली, गणेशपूर (ता. खामगाव) आणि जानेफळ (ता. मेहकर) या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्यूएएस) पुरस्कार प्राप्त झाला आहे.
राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्रामार्फत ७ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील गणेशपूर, जानेफळ, किन्होळा, पिंपळगाव काळे व हातेडी या केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. केंद्रीय परीक्षकांनी विविध कडक निकषांच्या आधारे हे परीक्षण केले. यामध्ये तातडीचे उपचार व संदर्भ सेवा, प्रसूती सेवा व रुग्ण सुविधा, परिसर स्वच्छता व उद्यान व्यवस्था, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आदी निकषांचा समावेश होता.
डीसी, सीईओंचे मार्गदर्शन
हे मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, आधार फाउंडेशन (जालना) आणि स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुने विशेष परिश्रम घेतले.

जिल्ह्यातील पिंपळगाव काळे व हतेडी या दोन केंद्रांचे अहवालदेखील लवकरच जाहीर होणार असून, तिथेही सकारात्मक निकालाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या यशाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाने संबंधित केंद्रांचे अभिनंदन केले.



तीन वर्षे मिळतील वार्षिक तीन लाख
या मानाच्या पुरस्काराचे फळ म्हणून या आरोग्य केंद्रांना पुढील तीन वर्षांसाठी दरवर्षी तीन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या निधीचा विनियोग रुग्णांच्या सोयी-सुविधा वाढवण्यासाठी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे.

National awards to three health centers

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top