mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धाड परिसरात निसर्गाचा कोप वादळी पाऊस आणि गारपिटीने मका, गहू भुईसपाट : Nature’s Fury Strikes the Dhad Region: Stormy Rains and Hail Flatten Maize and Wheat Crops.

शेअर करा :

Nature’s Fury Strikes the Dhad Region: Stormy Rains and Hail Flatten Maize and Wheat Crops. : धाड परिसरात निसर्गाचा कोप वादळी पाऊस आणि गारपिटीने मका, गहू भुईसपाटNature's Fury Strikes the Dhad Region: Stormy Rains and Hail Flatten Maize and Wheat Crops. 

धाड प्रतिनिधी : 

    धाड परिसरात १९ मार्च ला रात्री ९ ते ९:३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

डोमरूळ येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान:

  डोमरूळ येथील शेतकरी तुकाराम तोताराम पाडळे (गट नंबर ७६) यांच्या शेतातील मका आणि गहू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे मक्याची पिके पूर्णपणे कोलमडली असून गारपिटीमुळे दाण्यांचेही नुकसान झाले आहे. वर्षभर घाम गाळून जोपासलेली पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने पाडळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Nature's Fury Strikes the Dhad Region: Stormy Rains and Hail Flatten Maize and Wheat Crops.

​परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचेही असेच नुकसान झाले असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top