mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

नवोदय निवड परीक्षा ७ फेब्रुवारीला : Navodaya Selection Exam 7th February

शेअर करा :

Navodaya Selection Exam 7th February : जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी आणि अकरावीच्या रिक्त जागांसाठीची निवड चाचणी परीक्षा शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध

बुलढाणा : जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी आणि अकरावीच्या रिक्त जागांसाठीची निवड चाचणी परीक्षा शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Navodaya Selection Exam 7th February

सकाळी १०.३० ते दुपारी ०१.३० या वेळेत इयत्ता नववीसाठी खामगाव येथील जे.व्ही. मेहता हायस्कूल, नॅशनल हायस्कूल व अंजुमन हायस्कूल या तीन केंद्रावर तर अकरावीसाठी पी.एम. श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव व म.बी. बुरुंगले हायस्कूल शेगाव या दोन परीक्षा केंद्रावर निवड चाचणी परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.
परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र नवोदय विद्यालयाच्या www.navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट सोबत ठेवावी. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या केंद्राची खात्री करून परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत आवश्यक साहित्य घेऊन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन, पी.एम. श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top