mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाण्याला नवे नेतृत्व : New Leadership for Buldhana

शेअर करा :

New Leadership for Buldhana : बुलढाण्याला नवे नेतृत्व : डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 

New Leadership for Buldhana
डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारताना; मावळते  जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते स्वागत.

बुलढाणा :

बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला नवे नेतृत्व लाभले असून डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी आज नूतन जिल्हाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित साध्या पण औपचारिक कार्यक्रमात मावळते  जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी त्यांचे स्वागत करून प्रशासकीय सूत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली.

New Leadership for Buldhana

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. देवरे यांनी तात्काळ कामकाजाला सुरुवात करत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि जिल्ह्याच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेतला.

यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनतेपर्यंत सेवा वेळेत पोहोचवणे आणि प्रशासनात गतीमानता आणणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असेल. तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा https://mahadesha.com/

डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top