mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शिवजयंतीनिमित्त वरुड बुद्रुक येथे डॉ. गायत्रीताई सावजी यांचे प्रेरणादायी शिवव्याख्यान : On the occasion of Shiv Jayanti, Dr. Gayatritai Sawji’s inspirational lecture on shiva at varud budruk

शेअर करा :

On the occasion of Shiv Jayanti, Dr. Gayatritai Sawji’s inspirational lecture on shiva at varud budruk : शिवजयंतीनिमित्त वरुड बुद्रुक येथे डॉ. गायत्रीताई सावजी यांचे प्रेरणादायी शिवव्याख्यान उत्साहात पार पडले.

 

On the occasion of Shiv Jayanti, Dr. Gayatritai Sawji's inspirational lecture on Shiva at Varud Budruk:

जाफ्राबाद . १८ फेब्रुवारी २०२६ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवबा प्रतिष्ठान वरुड बुद्रुक यांच्या वतीने आयोजित युवा शिवव्याख्यात्या डॉ. गायत्रीताई सावजी यांचे शिवव्याख्यान आज न्यू हायस्कूल, वरुड बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गायत्रीताई सावजी यांच्या सत्काराने झाली. हा सत्कार माजीसभापती जालना शितलताई गव्हाड  व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश पाटील गव्हाड उपस्थित होते.
डॉ. गायत्रीताई सावजी यांनी अत्यंत सुंदर आणि सखोल पद्धतीने विचार मांडले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महिलांची सुरक्षा, शिवसंस्कार आणि इतर महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांना शिवचरित्र आणि स्वराज्याचे मूल्य अधिक जवळून जाणवले.
या कार्यक्रमास न्यू हायस्कूल आणि जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकवृंद आणि शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सर्वांनी डॉ. गायत्रीताई यांच्या व्याख्यानाचा आनंद घेतला . व  अशा कार्यक्रमांद्वारे तरुण पिढीला शिवाजी महाराजांचे आदर्श आणि शिवसंस्कार शिकवण्याचे कार्य सातत्याने सुरूच राहील असे शिवबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगण्यात आले .

On the occasion of Shiv Jayanti, Dr. Gayatritai Sawji's inspirational lecture on shiva at varud budruk

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top