mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लोखंडी प्लेट डोक्यावर पडून एकाचा मृत्यू; दुसरा गंभीर : One dies after iron plate falls on head

शेअर करा :

One dies after iron plate falls on head : लोखंडी प्लेट डोक्यावर पडल्याने एका जणांचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी झाला. रिद्धपूर येथे ही घटना घडली. 

One dies after iron plate falls on headयाच निर्माणाधीण पुलाची लोखंडी प्लेट पडून ईश्वरचा बळी गेला.

गॅस सिलिंडरसाठी जाताना अपघात : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरच्या उड्डाणपुलाजवळ दुर्घटना

अमरावती : गॅसची निर्माण झालेली टंचाई एका नागरिकाच्या जीवावर बेतली. गॅस सिलिंडर घेण्यासाठी जात असताना निर्माणाधीन पुलाची एक क्विंटल वजनाची लोखंडी प्लेट डोक्यावर पडल्याने एका जणाचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी झाला. रिद्धपूर येथे ही घटना घडली.

अमरावती जिल्ह्यातील दाभेरी येथील ईश्वर भुरभुरे (४५) व त्यांचा मित्र प्रभू वानखडे हे दोघे दुचाकीने चांदूर बाजारकडे गॅस सिलिंडर आणण्यासाठी दुचाकीने निघाले होते. रिद्धपूर रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून तेथे सेंट्रिंगचे काम सुरू होते. त्याच पुलाखालून जात असताना एक क्विंटल वजनाची लोखंडी प्लेट ईश्वर यांच्या डोक्यावर कोसळली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता ईश्वर यांना मृत घोषित करण्यात आले. जखमी मित्रावर उपचार सुरू आहेत.

युद्धाचा परिणाम म्हणून लोकांना सध्या गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांवर गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यातूनच ईश्वर यांचा बळी गेला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

या घटनेची माहिती समजल्यानंतर दाभेरी ग्रामस्थांनी रुग्णालयात रोष व्यक्त केला. ईश्वरच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल संबंधित कंत्राटदार आणि सुपरवायझरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. योजनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ईश्वर वर्गे व वैभव घोगरे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top