mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आरटीई प्रवेशातील एक किलोमीटरची जाचक अट विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक : One kilometer condition in RTE access is harmful

शेअर करा :

One kilometer condition in RTE access is harmful : आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक किलोमीटरची अट विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायी ठरत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तथा शाळा वाचवा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.

One kilometer condition in RTE access is harmful


विद्यार्थी शिक्षणाला मुकणार : मुदतवाढीसाठी आंदोलनाचा इशारा
बुलढाणा : आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक किलोमीटरची अट विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायी ठरत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तथा शाळा वाचवा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत ‘एक किलोमीटर अंतर’ ही अट लादल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत किमान एक महिना वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरटीई प्रवेशासाठी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे निवासस्थान संबंधित शाळेपासून एक किलोमीटरच्या हद्दीत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी ही मर्यादा तीन किलोमीटरपर्यंत होती. शहर व ग्रामीण भागातील अनेक शाळा नागरी वसाहतींपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याची भावना पालकांकडून व्यक्त होत आहे.

जाचक अटीने भरता आले नाही अर्थ
पालकांच्या म्हणण्यानुसार, एक किलोमीटरची अट कठोरपणे लागू केल्यामुळे अनेक कुटुंबांना आपल्या मुलांचे अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तीन किलोमीटरची अट लागू करावी किंवा किमान सध्या असलेली अट शिथिल करावी. तसेच, वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थी हक्क महत्त्वाचा

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून तो अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना सतीश पवार, सुरेश जाधव, प्रा. कडुबा पैठणे, अर्जुन खरात, समाधान झिने, मिलिंद जाधव, चंद्रकांत धुरंदर, विजय पवार उपस्थित होते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top