Our Goverment Service Center opens at Mahatma Gandhi Collage : येथील महात्मा गांधी महाविद्यालयात राज्य शासनाची आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यास अधिकृत मान्यता मिळाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवा, प्रमाणपत्रे व ऑनलाइन अर्जप्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांसह नागरिकांना मिळणार थेट सुविधा : दुधा परिसरात आनंद
दुधा : येथील महात्मा गांधी महाविद्यालयात राज्य शासनाची आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यास अधिकृत मान्यता मिळाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवा, प्रमाणपत्रे व ऑनलाइन अर्जप्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होणार आहे. आता ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज राहिली नाही. परिसरातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य गणेश कड यांनी केले आहे.
प्रशासनाने आधुनिक संगणक सुविधा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी व प्रशिक्षित कर्मचारी यांच्या मदतीने हे सेवा केंद्र सुरू केले आहे. उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार दुरुस्ती, शिष्यवृत्ती अर्ज, विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरणे आदी सेवा येथे दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात फेऱ्या मारण्याची गरज राहिली नाही. विद्यार्थ्यांसाठी तर हे केंद्र विशेष उपयोगी ठरणार असून शैक्षणिक दाखले व शिष्यवृत्तीसंदर्भातील कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश कड यांनी सांगितले की, महाविद्यालय हे केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता सामाजिक सेवा व डिजिटल साक्षरतेचे केंद्र व्हावे, हा आमचा उद्देश आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा प्प्ररयत्यन राहील.
या मान्यतेबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने शासनाचे आभार मानले असून, स्थानिक नागरिकांनीही या सुविधेचे स्वागत केले आहे. लवकरच अधिक सेवा जोडण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.