poisoning; Two teenage brothers die : धाड येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आईसह दोन चिमुकले अत्यवस्थ आहे.
आईसह दोन मुली अत्यवस्थ : धाड येथील दुर्दैवी घटना
धाड : बुलढाणा तालुक्यातील धाड येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आईसह दोन चिमुकले अत्यवस्थ असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातून विषबाधा झाली असावी, असे सांगण्यात येत आहे.
मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४) व मशीरा मोहंमद जमदार (वय ७) या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४), मुलगी फातिमा वसीम जमदार (वय ८) व अश्मिरा वसीम जमदार (वय ३) या तिघींवर उपचार सुरू आहेत. यातील एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मोहंमद वसीम जमदार यांच्या कुटुंबातील पत्नी व मुलांना रविवारपासून पोटदुखी, मळमळ उलट्यांचा त्रास होत होता. सोमवार, ६ एप्रिल २०२६ च्या सकाळी हा त्रास वाढतच गेल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अली व मशिरा यांचा मृत्यू झाला. आई व दोन मुली यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याने त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. बहीण भावाचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने धाड व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात
आहे.


