mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धामणदरीतील प्रज्वलची आत्महत्या : Prajwals suicide in Dhamandari

शेअर करा :

Prajwals suicide in Dhamandari : गौतमनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Prajwal's suicide in Dhamandari

बुलढाणा : शहराला लागून असलेल्या धामणदरी भागातील गौतमनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ६ फेब्र्रुवारीच्या दुपारी दीड वाजता ही घटना उघडकीस आली.
प्रज्वल नितीन जाधव (वय २१) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बारा ते तेरा वर्षांचा असतानाच आईचे छत्र हरविल्यानंतर आजी व वडिलांनीच त्याचा सांभाळ केला. काही महिन्यांपूर्वी आजीचे निधन झाले. दरम्यान, त्याचे वडील पुणे येथे कामाला गेले होते. दुपारच्या वेळी प्रज्वल एकटाच घरी होता. साडीच्या साह्याने गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रज्वल याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top