mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड प्रशांत जामोदे : Prashant Jamode elected as Central Vice President

शेअर करा :

Prashant Jamode elected as Central Vice President : सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे यांची केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Prashant Jamode elected as Central Vice President
प्रशांत जामोदे

राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात निवड

बुलढाणा : शिर्डी येथे पार पडलेल्या अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे यांची केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

२००२-२००३ पासून जामोदे यांनी कर्मचारी संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. नागपूर–बुलढाणा विभागात संघटनात्मक कार्याची भक्कम उभारणी केली आहे. विविध स्तरांवरील निवडणुका लढवून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. सन २००८ पासून ते ग्रामसेवक युनियनच्या व्यासपीठावर सातत्याने कार्यरत राहून विभागीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत.

संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी समन्वय साधत विविध योजना राबवल्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून कर्मचारी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवून त्यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभागी आहेत.

त्यांच्या निवडीमुळे राज्यातील कर्मचारी चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरचिटणीस संजय महाळंकर, कोषाध्यक्ष गोपीचंद कातुरे व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून केले. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष अशोक काळे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रमेश होले यांनीही जामोदे यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top