mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

PSI पदावर निवड प्रशांत ठोंबरे यांचा धाडमध्ये जल्लोषात सत्कार : Prashant Thombre Felicitated with Great Fanfare in Dhad Following His Selection for the Post of PSI

शेअर करा :

Prashant Thombre Felicitated with Great Fanfare in Dhad Following His Selection for the Post of PSI : PSI पदावर निवड प्रशांत ठोंबरे यांचा धाडमध्ये जल्लोषात सत्कार

Prashant Thombre Felicitated with Great Fanfare in Dhad Following His Selection for the Post of PSI

परिश्रमाचे फळ मान्यवरांच्या हस्ते गौरव सोहळा उत्साहात संपन्न

धाड (प्रतिनिधी) – दुधा येथील प्रशांत आत्माराम ठोंबरे यांची PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदावर निवड झाल्याबद्दल आज धाड येथे  त्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, धाड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष API प्रताप भोस, तसेच महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा प्रमोद यंडोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी धाड व पंचक्रोशीतील आप्तेष्ट, मित्रमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठोंबरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांच्या यशामागील कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे सर्वांनी कौतुक केले.

प्रशांत ठोंबरे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर PSI पद मिळवून तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top