mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डिजिटल जनगणना 2027’ साठी बुलढाण्यात तयारीला वेग : Preparations for ‘Digital Census 2027’ Gain Momentum in Buldhana

शेअर करा :

Preparations for ‘Digital Census 2027’ Gain Momentum in Buldhana : डिजिटल जनगणना 2027’ साठी बुलढाण्यात तयारीला वेग

Preparations for 'Digital Census 2027' Gain Momentum in Buldhana

बुलढाणा : आगामी डिजिटल जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, जनगणनेचे काम अधिक अचूक, पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.

जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी प्रशिक्षण समारोपावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जनगणना ही देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान घेऊन हे कार्य अचूकपणे पूर्ण करावे.”

जिल्हा नियोजन सभागृह आणि जिजाऊ सभागृह येथे दोन टप्प्यांत आयोजित या प्रशिक्षणात 81 फिल्ड ट्रेनर्सना 4 मास्टर ट्रेनर्समार्फत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी ग्रामीण भागातील येळगाव तसेच शहरी भागातील रामनगर येथे घरभेटी देत जनगणनेची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.

Preparations for 'Digital Census 2027' Gain Momentum in Buldhana

मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनीही प्रशिक्षणात उपस्थित राहून डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, अचूक डेटा संकलन आणि पारदर्शकता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी लिंक ला टच करा https://mahadesha.com/

या वेळी जनगणना संचालनालयाचे अधिकारी, मास्टर ट्रेनर्स तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समारोप कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी सुरेश कव्हळे, तहसीलदार संजीवणी मुपडे आणि नायब तहसीलदार प्रमोद करे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशासनाने सर्वांनी समन्वयाने आणि जबाबदारीने हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top