Procurement of Agricultural Produce Halted Due to Shortage of Gunny Bags : बारदाणा अभावी शेतमाल खरेदी ठप्प: शिवसेनेचा जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा

बुलढाणा :
शेतकऱ्यांच्या घरात पिकवलेला शेतमाल पडून असताना, बारदाण्याच्या तुटवड्याचे कारण देत शासकीय हमीभाव केंद्रे बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांची भेट घेऊन तातडीने खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.
गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वीही शेतकऱ्यांच्या घरातला शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत हमीभाव केंद्रे सुरू ठेवण्याची मागणी शिवसेनेने केली होती. त्यावेळी शासनाने काही प्रमाणात का होईना, पण केंद्रे पुन्हा सुरू केली होती. मात्र, आता बारदाणा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून ही केंद्रे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. ऐन हंगामात शेतमाल घरात पडून असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
आज, १३ एप्रिल २०२६ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, जर येत्या काळात खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू झाली नाहीत, तर शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा बुधवत यांनी दिला.

या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह शिवसेना प्रवक्त्या सौ. जयश्रीताई शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शिवसेना मोताळा तालुकाप्रमुख विजय इंगळे, रवी राजपूत, गोविंद डांगर, मोहित राजपूत, अनिल राणा, गजानन धांडे, मुंढे साहेब, सुरेखा तायडे, रत्नाताई शेळके, सुनंदाताई खरात, स्मिता वराडे, अनिता जाधव, ऋणाली उबरहांडे, सपना इंगळे, शीतल सुरडकर, पल्लवी शेळके, बेबी परिहार, सुवर्णा जाधव, सुनीता दराखे, भारती डागोर, श्रीकांत जाधव, निर्मल इंगळे, अमित जाधव, भीमराव गवळी, सुभाष गवळी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


